Ad will apear here
Next
अमृता फडणवीस यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सीएम चषक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही सीएम चषक स्पर्धेत भाग घेतला. १५ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईतील खेतवाडी येथील भगिनी सभागृहात सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः हातात बॅडमिंटन रॅकेट घेत मैदानात उतरल्या आणि उपस्थित महिला खेळाडूंमध्ये उत्साह भरला. या स्पर्धेला गृहिणी आणि तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभला.

या वेळी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, गिरगावच्या नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी, वाळकेश्वरच्या नगरसेविका ज्योत्स्नाबेन मेहता, ताडदेवच्या नगरसेविका सरिता पाटील, मलबार हिल भारतीय जनता पक्ष अध्यक्षा श्वेता मांजरेकर यांसह भाजप तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील महिलांनी काढलेल्या आकर्षक आणि भव्य अशा विविध रांगोळ्यांना भेट देत अमृता यांनी स्पर्धकांचे कौतुक केले; तसेच स्वतः रांगोळीही काढली. सीएम चषकाच्यानिमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आणि मुख्यत्वे तरुणी आणि गृहिणींना हक्काचे क्रीडा-कला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेल्याचे चित्र महाराष्ट्रासाठी आशादायी असल्याचे अमृता यांनी या वेळी सांगितले.

‘अमृता फडणवीस या स्वतः राज्यस्तरीय टेनिसपटू राहिल्या असून, त्यांच्या उपस्थितीने सीएम चषकमधील सहभागी महिलांचा आत्मविश्वास आणखी दुणावला आहे,’ असे भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले.



महाराष्ट्रभरातून सीएम चषकला उदंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एकूण ३५ लाखांहून अधिक खेळाडूंनी यात सहभाग घेतला आहे. महिलाही यात मागे नसून आतापर्यंत पाच लाखांहून जास्त महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. १२ जानेवारी २०१९ रोजी मुंबईत भव्य कार्यक्रमरूपाने या स्पर्धेची समाप्ती होणार आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQQBV
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे
‘सीएम चषका’मध्ये १४ लाख लोकांचा सहभाग मुंबई : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषका’ला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित ‘सीएम चषका’ला प्रदेशस्तरावर उत्तम प्रतिसाद मिळत असून, मुंबई
सीएम चषक युवा महासंगम तीन फेब्रुवारीला मुंबईत मुंबई : ‘राज्यातील ४३ लाख युवांचा सहभाग असलेल्या ‘सीएम चषक’ या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा मुंबई, पुणे व अहमदनगर येथे मंगळवारी सुरू झाली. मुंबईत तीन फेब्रुवारी रोजी युवा महासंगम आयोजित करण्यात आला असून, त्यात ५० हजार युवक-युवती सहभागी होणार आहेत
‘दिव्याज फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद’ मुंबई : ‘संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे; पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी मिळवून देण्याचे कार्य दिव्याज फाउंडेशन करते. त्यामुळे मुलांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language